Prawns Koliwada
प्रॉन्स कोळीवाड़ा
प्रॉन्स कोळीवाड़ा म्हणजे कोळीवाड्यातील एक प्रसिद्ध स्टार्टर डिश.
![]() |
| Prawns Koliwada |
साहित्य:-
- १८ ते २० मध्यम आकाराची कोळंबी
- आले-लसुन पेस्ट - २ टीस्पून
- लाल तिखट - ३ टीस्पून
- तांदळाचे पीठ - १ टीस्पून
- लिंबाचा रस - ३ टीस्पून
- बारीक़ रवा - १ वाटी
- मीठ चवीपुरते
- तेल
कृती:-
- प्रथम कोलंबी स्वच्छ धुऊन घ्या
- कोलंबी साफ़ करून तिचा शेपटीकडला भाग अखंड ठेवा.( मोठी कोलंबी असल्यास काळा धागा काढून टाकावा )
- पुनः कोलंबी स्वच्छ धुउन पूर्णपणे कोरडी करून घ्या.
- एका वाङग्यामध्ये कोरडी केलेली कोलंबी, आले-लसुन पेस्ट, लाल तिखट,लिंबाचा रस, तांदळाचे पीठ आणि मीठ यांच एकजीव मिश्रण करुन घ्यावे.
- १५ ते २० मिनिटे कोलंबी चांगली मॅरिनेट होऊन दयावी
- नंतर एक एक कोलंबी बारीक़ रव्यामधे कालवून १ तास ठेवून दयावी.
- एका तासानंतर कोलंबी गरम तेलात मध्यम आचेवर डिप फ्राई करुन घ्यावीत.
- ग्रीन चटनी सोबत गरमागरम सर्व कराव्यात.
टिप्स:-
- कोलंबीचा शेपटिकडला भाग अखंड ठेवल्यास कोलंबी दिसण्यास मोठी आणि फ्राई केल्यानंतर जास्त आकडत (SHRINK) नाही.
- कोलंबी रव्यामधे घोळवून(कालवुन) १ तास ठेवल्यामुळे फ्राई करताना रवा कोलंबीला व्यवस्थित चिटकुन राहतो आणि कोलंबी चांगल्या कुरकुरित होतात.

Comments
Post a Comment